शाळकरी विद्यार्थ्यांची व्हॅन भररस्त्यात पेटली; चालकाच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला;

सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील वाठार कॉलनी येथील हायस्कूलची मुलं शाळेत घेऊन जात असलेल्या एका स्कूल व्हॅनने अचानक पेट घेतला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना लोणंद शिरवळ रोडवरील शेडगेवाडी फाट्याजवळ घडली. ही स्कूल व्हॅन CNG (सीएनजी) वर चालवली जात असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सदर व्हॅनमध्ये शेडगेवाडी येथील ८ ते १० विद्यार्थी होते.

व्हॅनने अचानक पेट घेतल्यावर प्रसंगावधान राखून चालकाने सर्व मुलांना सुखरूप बाहेर काढले. मात्र, या आगीत स्कूल व्हॅन संपूर्ण जळून खाक झाली आहे. या स्कूल व्हॅनचा चालक हा वाठार कॉलनी येथील हायस्कूलचाच शिपाई असल्याचे समजतं आहे. या अपघाताने स्कूल व्हॅनच्या आणि विद्यार्थ्यांच्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *