मुंबई जिल्हा अध्यक्षपदी तुषार चव्हाण यांची निवड

सलून ब्युटी पार्लर असोसिएशन महाराष्ट्र राज्य  या महाराष्ट्रातील अग्रेसर ट्रेड संस्थेच्या दादर इथल्या सभागृहात दिनांक १२ जानेवारी २०२३ रोजी  संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय चव्हाण  यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेत सलून ब्युटी पार्लर असोसिएशन महाराष्ट्र राज्य कमिटी तसंच मुंबई जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली. या  सभेत महाराष्ट्र  राज्य अध्यक्षपदी दीपक महादेव यादव   यांची एकमताने निवड करण्यात आली. तसंच सरचिटणीसपदी  किसनराव कोराळे, कार्याध्यक्ष निलेश रणदिवे, खजिनदार सतीश पवार यांची निवड घोषित करण्यात आली.

मुंबई जिल्हा अध्यक्षपदी प्रसिध्द हेअर आर्टिस्ट तुषार चव्हाण  यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. तसंच सेक्रेटरीपदी  प्रसिद्ध हेअर आर्टिस्ट सचिन टक्के, उपाध्यक्ष संदीप बद्रिके,  खजिनदार अनिल पवार यांची निवड घोषित करण्यात आली. महाराष्ट्र प्रभार पदी प्रसिद्ध हेअर आर्टिस्ट उदयजी टक्के यांची फेरनिवड झाली.

महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख पदी प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट प्रसाद चव्हाण. याची निवड झाली. येत्या चालू वर्षामध्ये सलून ब्युटी पार्लर असोसिएशन महाराष्ट्र राज्य या संस्थेने ‘सलून व ब्युटी पार्लर’ हा व्यवसाय अत्यावश्यक सेवेत आणण्याचा अजेंडा हाती घेतला आहे. त्यासाठी सलून ब्युटी पार्लर असोसिएशनने महाराष्ट्रातील सर्व संस्थाना एकत्र येण्याचे आवाहन केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *