व्हिडीओकॉन – आयसीआयसीआय बँकेतील आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी चंदा कोचर आणि दीपक कोचर यांना मुंबई हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. बँक कर्ज गैरव्यवहाराप्रकरणी चंदा कोचर आणि दीपक कोचर यांना गेल्या वर्षी अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता हायकोर्टाने कोचर दाम्पत्याला जामीन मंजूर केला आहे.
कोचर दाम्पत्याने सीबीआयने केलेली अटक बेकायदेशीर असल्याच्या याचिका हायकोर्टात दाखल केली होती. सीबीआयची कारवाई बेदायदेशीर असल्याचा दावा करत जेलमधून तात्काळ सुटकेची कोचर यांनी कोर्टाकडे केली होती. त्यानंतर 1 लाख रुपयांच्या जातमचुलक्यावर कोचर दाम्पत्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.
