तक्रार केली म्हणून एकाला जिवंत पेटवलं, दोघांवर तलवारीनं वार

तक्रार केली म्हणून एकाला जिवंत पेटवलं, दोघांवर तलवारीनं वार

अवैध हातभट्टीची तक्रार केल्यानं दारु विक्रेत्यानं तक्रारदाराला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली

रामप्रवेश गुप्ता नावाच्या व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. उल्हासनगरमध्ये ही घटना घडलीय.

बेकायदेशीर दारूच्या व्यवसायाची तक्रार केल्यामुळे चळवताळलेल्या विक्रेत्यानं गुप्ता यांच्यावर हा प्राणघातक हल्ला केला. तर दारूविक्रेत्याच्या कुटुंबीयांनी संतोष कुलाल आणि बाबू कुलाल यांच्यावर तलवारीने वार केले. या हल्ल्यात संतोष आणि बाबू दोघेही गंभीर जखमी झालेत.

याप्रकरणी आरोपी योगेश शिंदे, संतोष शिंदे, दिनेश शिंदे, आकाश शिंदे, माया शिंदे यांविरोधात उल्हासनगर पोलीस ठाण्यात कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पुढील तपास सुरू आहे… पण, या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही, असं पोलीस सांगतायत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *