पुण्यातील तरुणाचा प्रताप पाहून सर्वच हादरले; पतंजलीच्या मीटिंगमध्ये अचानक सुरु केला ‘तो’ व्हिडीओ…

गेल्या अडीच वर्षापासून कोरोनामुळे लोकांच्या सर्वच सवयी बदलल्या आहेत. कोविड काळात लावण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे अनेकांना लोकांच्या कामावरही गंभीर परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोविडमुळे घराबाहेर पडता न आल्याने अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमचा  पर्याय स्विकारला होता. यावेळी ऑनलाईन मीटिंगद्वारे कर्मचारी आपली कामे करत होती. पण या ऑनलाईन मीटिंगच्या  जगतात अनेकांनी केलेल्या चुका कायमच लक्षात राहतील. असाच काहीसा प्रकार पतंजलीच्या एका ऑनलाईन मीटिंगमध्ये घडलाय.

झूम मीटिंगदरम्यान घडला प्रकार

पंतजली योगपीठाशी संबधित हेल्थ रिसर्च सेंटरच्या ऑनलाइन झूम मीटिंगमध्ये हा प्रकार घडला. या मीटिंगमध्ये देश विदेशातील अनेक लोक जोडले गेले होते. मात्र यावेळी पुण्यातील एका तरुणाने या मीटिंगदरम्यान चक्क पॉर्न व्हिडीओ सुरु केला. त्याने हा व्हिडीओ मुद्दास सुरु केला की नकळतपणे याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

पोलिसांत गुन्हा दाखल

याप्रकरणी आता हरिद्वारच्या बहादराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे. पतंजलीशी संबंधित कमल भदोरिया आणि शिवम वालिया यांनी या घटनेची तक्रार केली आहे. ही सोशल मीडियावर व्हायरल होताच एकच गोंधळ उडाला आहे.

 मीटिंगमध्ये महिलांचाही सहभाग

पतंजलीकडून याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. पतंजली योगपीठीशी संबधित एक झूम मीटिंग सुरु होती. या मीटिंगमध्ये देश-विदेशातील लोक अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा करत होते. या मीटमध्ये महिलांचाही सहभाग होता. त्याचवेळी, एका तरुणाने अश्लील व्हिडिओ सुरु केला, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधीक्षक अजय सिंह यांनी दिली.

 येरवाड्यातील तरुणाचे कृत्य

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी पुण्याच्या येरवाडा येथे कॉलेज कॅम्पस येथे राहणाऱ्या आकाश नावाच्या एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयटी कायद्याअंतर्गत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी योग्य तपास करुन पुढील कारवाई करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *