मुंबई पोलीस आयुक्तांच्या मुलीच्या लग्नात ‘या’ बॉलिवूड कलाकारांनी लावली हजेरी

 बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan), रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हे कोणत्याही कार्यक्रमात हजेरी लावल्यानंतर तो ग्लॅमरस कार्यक्रमच म्हटला जातो. दरम्यान, या तिघांनी यावेळी मुंबई पोलीस आयुक्तांच्या मुलीच्या लग्नात हजेरी लावली, या कार्यक्रमात बॉलिवूड स्टार्स त्यांच्या स्टायलिश लूकमध्ये पोहोचले. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर ( Mumbai Commissioner Vivek Phansalkar) यांची मुलगी मैत्रेयी फणसळकर हिच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीत सलमान, रणवीर आणि शिल्पा शेट्टीनं हजेरी लावली आहे. या दरम्यान, रणवीरनं तर परफॉर्म केलं. विवेक फणसळकर यांच्या मुलीच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

या कार्यक्रमात सलमान, रणवीर आणि शिल्पा स्टायलिश लूकमध्ये दिसले. सलमान खानचा एक फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये तो स्टेजवर वधू-वरांचे अभिनंदन करताना दिसत आहे. यादरम्यान सलमानने काळ्या रंगाचा सूट परिधान केला होता, ज्यामध्ये तो खूपच हॅंडसम दिसत होता. फोटोमध्ये मैत्रेयीनं सलमान खानचा हात पकडला होता. सोबतच रणवीर सिंगही डॅपर लूकमध्ये दिसला. रणवीरनं यावेळी गुलाबी रंगाची पँट आणि फ्लोरल ब्लेझरसह निळा शर्ट, तपकिरी रंगाची टोपी परिधान केली होती. शिल्पा शेट्टीनं लाल रंगाची साडी परिधान केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *