शिक्षण विभाग इकडे लक्ष देईल का? नालासोपाऱ्यात विद्यार्थी शिकतायत झाडाखाली

 वसई विरार शहरात (Vasai-Virar) एकीकडे खाजगी अनधिकृत शाळांचे (Unauthorized School) पीक वाढत चाललं आहे. याकडे शिक्षण विभाग (Education Department) दुर्लक्ष होत आहे. तर दुसरीकडे सरकारच्या जिल्हा परिषद शाळेतील (ZP School) विद्यार्थ्यांना चक्क झाडाखाली बसून शिक्षण घेण्याची वेळ आलीय. पावसाळ्यापासून गेले तब्बल चार महिने ही मुलं उघड्यावर झाडाखाली बसून शिक्षणाचे धडे घेत आहेत. मात्र त्यांच्या या गैरसोयीचं शिक्षण विभागाला कोणतंही सोयरं सुतक दिसून येत नाहीये.

झाडाखाली विद्यार्थ्यांचं शिक्षण
झाडाला टांगलेले बॅनर, समोर ठेवलेला फळा, आणि मधल्या सुट्टीत गावभर फिरणारे विद्यार्थी. हे दृष्य कोणत्याही गावखेड्यातील नाही, तर मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नालासोपारा भागातील आहे. नालासोपाऱ्यातील (Nalasopara) पेल्हार भागातील जिल्हा परिषेदच्या मानपाडा शाळेची ही दुर्देवी अवस्था. या शाळेचे बांधकाम जून महिन्यात मोडकळीस आल्याने गेल्या पावसाळ्यापासून या शाळेत शिकत असलेले 110 विद्यार्थी हे उघड्यावर शिक्षण घेत आहेत.

शिक्षण विभागाचं दुर्लक्ष

खरंतर शिक्षण विभागाने या मुलांची छत असलेल्या पर्यायी सोय करणे गरजेचं होतं. मात्र याकडे दुर्लक्ष करत विद्यार्थ्यांना झाडाखालीचं बसवून शिक्षण दिले जातं आहे. त्यामुळे धुळीचा लोट, झाडाचा पडणारा पाला आणि आता कडाक्याच्या थंडीत या मुलांना मोकळ्या जागेतच बसावं लागत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *