नवी मुंबईतील पामबीच मार्गावर कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय नजीक चौकात आज सकाळी साडेआठच्या सुमारास इनोव्हा आणि सेलेनिओ गाडीचा अपघात झाला. या अपघातात दोन जण गंभीर जखमी असून तीन व्यक्ती किरकोळ जखमी आहेत.
नवी मुंबईतील पाम बीच वर होणारे अपघात हे वेगावर नियंत्रण न ठेवता आल्याने होतात. याची प्रचिती आज सकाळी पुन्हा एकदा आली. वाशी कोपरखैरणे मार्गावर कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय नजीकच्या चौकात एक सेलेरिओ आणि इनोव्हा गाडीचा भीषण अपघात झाला. सिलेंरिओ गाडी कोपरखैरणेकडून वाशीच्या दिशेला सुसाट जात असतात कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयकडे तिने अचानक वळण घेतले. त्याच वेळी वाशीकडून कोपरखैरणेच्या दिशेने जाणाऱ्या इनोव्हा गाडी चालकाला समोरील सेलेरिओ गाडीने अचानक वळण घेतल्याने त्याचाही ताबा सुटला व गाडी सेलेरिओवर जाऊन धडकली. तिचाही वेग जास्त असल्याने सिलेंरिओला धडकून थेट नाल्यात गेली. तर सेलेरिओ गाडी थेट पलटी झाली.
या अपघातात सेलेरिओचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशी माहिती एका प्रत्यक्षदर्शीने दिली. या अपघातात तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत, तर सिलेंरिओमधील दोन व्यक्ती गंभीर जखमी असून त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले आहे. जखमींची नावे अद्याप कळली नाहीत. अशी माहिती पोलिसांनी दिली.
