ट्रॅक्टरने चिरडल्याने आठ वर्षीय मुलीचा मृत्यू

शाळेतून घरी येत असताना पाठीमागून येणाऱ्या ट्रॅक्टरने एका आठ वर्षीय मुलीला चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील अर्जुनली येथे शनिवारी सकाळी उघडकीस आली. हर्षला विशे असे मृत मुलीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी ट्रॅक्टर चालक दीपक तुपे याला अटक केली आहे.

शहापूर तालुक्यातील अर्जुनली गावातील हर्षला सोमनाथ विशे (८) ही शाळा सुटल्यानंतर कॅनॉल रोडने घरी जात असताना मागून येणाऱ्या ट्रॅक्टरने हर्षला जोरदार धडक दिली. या धडकेत हर्षलाचा जागीच मृत्यू झाला. या धडकेनंतर ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून फरार झाला होता. याप्रकाराने संतप्त झालेल्या अर्जुनली ग्रामस्थांनी शहापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन ट्रॅक्टर चालकाला अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली होती. अखेर शहापूर पोलिसांनी ट्रॅक्टर चालक दीपक तुपे याला अटक केल्यानंतर अर्जुनली ग्रामस्थांनी हर्षलाचा मृतदेह ताब्यात घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *