प्रत्येकाच्या हातात मोबाईल आल्यामुळे हे जग छोटे झाले आहेत. आपल्याला कसलाही शोध घ्यायचा असेल किंवा माहिती जाणून घ्यायची असेल तर आपण सरार्स गुगलचा वापर करतो. सोशल मीडियाचं हे जग एक मायाजाळ आहे. लोक सोशल मीडियापायी क्रेझी झाले आहेत. शिंकलो तरी लोक सोशल मीडियावर अपडेट करतात, असं म्हणं आवग ठरणार नाही. खाजगी आयुष्यातील प्रत्येक अपडेट क्षणोक्षणी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक, इंस्टाग्रामवर केली जाते. फोटो आणि व्हिडिओचा भडीमार असतो. या सोशल मीडियाचा जेवढा फायदा आहे तेवढंच त्यापासून नुकसान आहे.
मसाज सेवा गेला शोधायला आणि…
या सोशल मीडियाचा धक्का एका नवऱ्याला ) बसला आहे. तो गुगलवर मसाज सेवा सर्च करत होता. अशात त्याची नजर एका वेबसाईटवर गेली त्याने ती उघडल्यानंतर त्यात अनेक महिलांचे फोटो होते. तो ते बघतच होतो आणि त्याचा पायाखालची जमीनच सरकली. कारण या फोटोमध्ये त्याला त्याची बायको आणि बहिणीचा अश्लील फोटो दिसला.
एवढंच नाही तर या फोटोखाली सेक्सचा दर आणि अश्लील शब्दात मजकूर लिहण्यात आला होता. या घटनेनंतर पती, पत्नी आणि बहिणीने पोलिसांचे दरवाजे ठोठावले. पोलिसांनी या वेबसाईटची चौकशी केली. ही वेबसाईट (website) एक महिला चालवत होती. पोलिसांनी त्या महिलाला अटक केली. रेश्मा रितेश यादव असं त्या महिलेचं नाव आहे.
कुठे घडली घटना?
ही मुंबईतील खारमधील (Khar in Mumbai) घटना आहे. पोलिसांनी रेश्मा यादव हिला न्यायालयात हजर केलं असता तिला जामीन मंजूर झाला आहे. त्यामुळे वेबसाईट मागचा खरा सूत्रधार कोण आहे आणि त्यावरील फोटो कोणा कोणाचे आहेत याचा तपास पोलिसांकडून करण्यात येतं आहे.
