महिला मंत्र्याला फेसबुकवर धमकी, एकाला अटक

महिला मंत्र्याला फेसबुकवर धमकी, एकाला अटक

मॅडम, तुमची बत्तीशी जरा जास्तच दिसत आहे,  तोडून टाकेन’, अशी प्रतिक्रिया एका महिला मंत्र्याच्या फेसबुक पेजवर एकाने लिहिली, आणि त्याला पोलिसांनी एकाला अटक केली.

झारखंडच्या शिक्षणमंत्री नीरा यादव यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासोबत काढलेला एक फोटो फेसबुकवर शेअर केला होता. या फोटोच्या कमेंटमध्ये यादव यांची बत्तीशी तोडण्याची धमकी देणाऱ्या झारखंडच्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

अशोक पंडित नावाच्या तरुणाने रविवारी यादव यांच्या फोटोवर ‘मॅडम, तुमची बत्तीशी जरा जास्तच दिसत आहे. तोडून टाकेन’ अशा आशयाची कमेंट केली होती. त्यानंतर नीरा यादव यांनी दिल्ली पोलिसांना फोन करुन तोंडी तक्रार नोंदवली. नीरा यादव यांच्या त्या फोटोवर एक हजाराहून अधिक लाईक्स आणि 17 शेअर होते.

सोमवारी तिलय्या पोलिसांनी अशोक पंडितला ताब्यात घेतलं असून चौकशी सुरु आहे. भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या निधनाच्या काहीच दिवसांपूर्वी त्यांना श्रद्धांजली वाहणाऱ्या झारखंडच्या शिक्षणमंत्री नीरा यादव चांगल्याच चर्चेत होत्या. त्यानंतर सोशल मीडियावर यादव यांच्याविरोधात टीकेची झोड उठली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *