कोरियन तरुणीसोबत (Korean girl) विनयभंगाची घटनेनंतर एका अजून एका धक्कादायक घटनेने मुंबई (Mumbai Crime) हादरली आहे. एका 42 वर्षीय महिलेवर घरात घुसून नराधमांनी अत्याचार केला आहे. संतापजन गोष्ट म्हणजे या नराधमांनी महिलेच्या प्रायव्हेट पार्टवर (Private part) सिगारेटचे (cigarettes) चटके दिले आहेत. या कृत्यानंतर दिल्ली निर्भया घटनेची आठवण ताजी होते. या घटनेनंतर मुंबईमध्ये एकच संतापाची लाट पसरली आहे.
नेमकं काय घडलं?
मुंबईतील कुर्ला (Kurla) पूर्व परिसरात पीडित महिला घरात एकटी असताना तीन नराधम शस्त्रासह घुसले. त्यांनी महिलेवर शस्त्राने वार केला आणि त्यानंतर तिच्यावर सामूहिक अत्याचार (ravishment) केला. त्यानंतर त्यांनी महिलेच्या प्रायव्हेट पार्टवर सिगारेटचे दिले आणि व्हिडिओ (Video) रेकॉर्ड केला. एवढंच नाही तर जर पोलीस (Police) तक्रार केल्यास मारून टाकण्याची धमकीही दिली. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या बुधवारी ही घटना घडली आणि रविवारी पोलिसांनी या घटनेची माहिती झाली.
आरोपी अद्याप फरार
पीडित महिलेनं आपल्यासोबत घडलेली घटना शेजाऱ्यांना सांगितली, अन् एका एनजीओसोबत संपर्क करण्यात आला. त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी 376 (बलात्कार), 376 डी (सामूहिक बलात्कार), 377 (अनैसर्गिक अत्याचार), 324 (धारधार शस्त्रांनी हल्ला) आणि इतर अन्य कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला. तिन्ही आरोपी सध्या फरार आहेत. पोलिसांनी घटनेचा तपास सुरु केला असून आरोपींचा शोध घेत आहेत.
