मुंबई हादरली! १३ वर्षांच्या मुलीसोबत शाळेतच सामूहिक अत्याचार, चौघांनी वर्गात कोंडून ठेवले नंतर…

पुन्हा एकदा भारताची आर्थिक राजधानी अत्याचाराच्या घटनेने हादरली आहे. १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच शाळेतील मुलांनी सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईतील महानगर पालिकेच्या शाळेतच ही घटना घडली असून आरोपींदेखील अल्पवयीन असल्याचं समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
बीएमसीच्या शाळेतच हा प्रकार घडल्याने संताप व्यक्त होत आहे. १३- १४ वर्ष वयोगटातील शाळकरी मुलांनी त्यांच्यात शाळेत शिकणाऱ्या मुलीला वर्गात बंद केले. त्यानंतर एका मुलाने तिच्यावर बलात्कार केला तर दुसऱ्याना विनयभंग केल्याचं पीडितेने म्हटलं आहे. पीडित मुलीली वर्गात घेऊन गेल्यानंतर आरोपींच्या टोळीतील दोन मुलं वर्गाबाहेर पहारा देत असल्याचंही समोर आलं आहे. सोमवारी ही घटना घडली आहे.सोमवारी ज्या वेळेस ही घटना घडली आहे त्याचवेळी सर्व विद्यार्थी व शिक्षण शाळेतील वार्षिक संमेलनाच्या कार्यक्रमात होते. त्याचवेळी आरोपींनी हा क्रुर खेळ रचला. पोलिसांनी या प्रकरणी पॉक्सो कायद्यांतर्गंत गुन्हा दाखल केला असून दोन अल्पवयीन आरोपींना अटक केली आहे. आरोपी अल्पवयीन असल्याकारण्याने त्यांना डोंगरीतील बाल सुधारगृहात ठेवण्यात आलं आहे.

सोमवारी ज्या वेळेस ही घटना घडली आहे त्याचवेळी सर्व विद्यार्थी व शिक्षण शाळेतील वार्षिक संमेलनाच्या कार्यक्रमात होते. त्याचवेळी आरोपींनी हा क्रुर खेळ रचला. पोलिसांनी या प्रकरणी पॉक्सो कायद्यांतर्गंत गुन्हा दाखल केला असून दोन अल्पवयीन आरोपींना अटक केली आहे. आरोपी अल्पवयीन असल्याकारण्याने त्यांना डोंगरीतील बाल सुधारगृहात ठेवण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *