पत्नीला सरपंचासोबत हॉटेलमध्ये नको त्या अवस्थेत रंगेहात पडकलं आणि मग…

जगासोबत आता देशातही विवाहबाह्य संबंधांच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. नवरा आणि बायको यांच्यामधील विश्वास तुटला की त्या नात्याला तडा जातो. प्रेम आणि विश्वासावर लग्नाचं  नातं पुढे जातं. पण गेल्या काही वर्षांमध्ये पती असो किंवा पत्नी यांचे घराबाहेर अफेयर असतात. हे विवाहबाह्य संबंध जेव्हा समोर येतात तेव्हा नातं तर तुटतंच पण अनेक वेळा ही घटना गुन्हेगारीकडे  वळते.

रंगेहात पडकलं आणि मग…

सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ (shocking video on social media) समोर आला आहे. एका पतीने आपल्या पत्नीला नको त्या अवस्थेत हॉटेलमध्ये (hotel) रंगेहात पडकलं. त्यानंतर संतापाच्या भरात पतीने पत्नी आणि प्रियकाला बेल्टने मारत रस्त्यावरून धिंड काढली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रंचड व्हायरल  होतो आहे.

बघ्यांची एकच गर्दी!

जेव्हा नवरा बायकोला आणि सरपंच प्रियकराला भररस्त्यात धुलाई करत नेत होत्या हे बघण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती. या घटनेची माहिती मिळतात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कारवाई केली.

उत्तरप्रदेशातील महाराजगंज याठिकाणी ही घटना आहे. नवरा बायकोचं 2017 मध्ये लग्न झालं होतं. लग्नानंतर दोघांमध्ये भांडण व्हायला लागली. त्यानंतर जेव्हा नवरा कामानिमित्त घराबाहेर जायचा पत्नी दिवसभर गायब असायची. मग या नवरा बायकोमधील भांडण सरपंचांपर्यंत गेले. तरीही यातून तोडगा निघाला नाही.

मग एकेदिवशी नवऱ्याला संशय आला. त्याने पत्नीचं भानगड शोधण्यासाठी नाटक रचलं. आपण कामासाठी घराबाहेर पडतोय असं दाखवलं आणि तो घराच्या गच्चीवर जाऊन लपवून बसला. नवरा कामावर गेला असं समजून बायको घराबाहेर पडली. नवऱ्याने तिचा पाठलाग केली. ती रस्त्यात अचानक कोणातरी सोबत बाईकवर बसून निघून गेल्याचं त्याने पाहिलं. पतीने पाठलाग सुरुच ठेवा. जेव्हा ही बाईक एका हॉटेलवर थांबली पतीचा पारा चढला. पतीने ताबडतोब मित्रांना बोलवून घेतलं आणि पत्नीला नको त्या अवस्थेत रंगेहात पकडलं.

नवऱ्याचा धक्कादायक आरोप 

हिचं हे पहिलंच कृत्य नाही, ही अनेक वेळा अशी दिवस दिवस गायब होते. ही दर दुसऱ्या दिवशी या प्रियकरासोबत हॉटेलमध्ये जात होती, असा आरोप संतापलेल्या पतीने केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *