गुड समेरिटन पुरस्कार योजनेचा आढावा घेण्याकरता राज्यस्तरीय देखरेख समिती नेमली जाणार आहे.

गुड समेरिटन पुरस्कार योजनेचा आढावा घेण्याकरता राज्यस्तरीय देखरेख समिती नेमली जाणार आहे.

केंद्र शासनाच्या रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाच्या मार्गदर्शनास अनुसरून मोटर वाहनांच्या जीवघेणा अपघातात अपघातग्रस्त झालेल्या व्यक्तीस तात्काळ मदत करणाऱ्या आणि अपघाताच्या गोल्डन अवर मध्ये अपघातग्रस्तांना हॉस्पिटल/ ट्रॉमा केअर सेंटर मध्ये वैद्यकीय उपचारासाठी घेऊन जाणाऱ्या गुड समेरिटनला अपघातात बळी पडलेल्या व्यक्तीचे प्राण वाचवल्याबद्दल पुरस्कार देण्याची योजना जाहीर केली आहे. योजनेचा आढावा घेण्याकरता राज्यस्तरीय देखरेख समिती नेमली जाणार आहे.

रस्त्यावरील मोटार अपघातातील अपघातग्रस्तांना आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्याकरता सामान्य जनतेस प्रवृत्त करणे व निष्पाप जीव वाचवण्यासाठी इतरांना प्रेरणा देणे/ प्रेरित करण्याच्या उद्देशाने सदर योजना सुरू करण्यात आली आहे. रस्ते परिवहन व महामार्ग मंत्राने या पुरस्काराच्या योजनेबाबत दिनांक 4 ऑक्टोबर 2021 रोजी मार्गदर्शक तत्वे निर्गमित केली होती. सदर मार्गदर्शक तत्वातील परिच्छेद 7.3 व 7.5 अन्वये राज्यस्तरीय देखरेख समिती स्थापन करणे सक्तीचे केले आहे. गुड समेरिटनला अपघातात बळी पडलेल्या व्यक्तीचे प्राण वाचवल्याबद्दल पुरस्कार देण्याबाबत सदर योजनेच्या योग्य अंमलबजावणी बाबत त्रैमासिक आढावा बैठक घेण्यासाठी राज्यस्तरीय देखरेख समिती स्थापन करणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *