थायलंड बॉम्बस्फोट; दोन भारतीय ताब्यात

थायलंडमधील प्रसिद्ध ब्रह्म मंदिरातील भीषण बॉम्बस्फोटप्रकरणी दोन भारतीयांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या बॉम्बस्फोटप्रकरणी हव्या असलेल्या एका विदेशी संशयितासोबत हे दोघे भारतीय बोलत होते, असे सीसीटीव्हीवर दिसल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले, असे थायलंड पोलिसांनी सांगितले.

या दोघांची ओळख उघड करण्यात आलेली नाही. चौकशीसाठी या दोघांना लष्कराच्या छावणीत नेण्यात आले, असे वृत्त द नॅशनने पोलिसांच्या हवाल्याने दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *