सरकार बदलले, आता मुंबईतही बदल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

मुंबई तसेच एकूणच महाराष्ट्रात पायाभूत सुविधांची कामे मोठय़ा प्रमाणावर सुरू असून राज्याला देशातले प्रथम क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी आम्ही ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार सध्या सुरू असलेले पायाभूत सुविधा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित केल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दिली. राज्यातील सरकार बदलले असून आता मुंबईही बदणार असल्याची ग्वाहीही त्यांनी या वेळी दिली.

गोरेगाव येथील एसटेक प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी शिंदे बोलत होते. महानगर आयुक्त एसव्हीआर श्रीनिवासन, तसेच बांधकाम क्षेत्रातील मनीष गांधी, एसीटेक प्रदर्शनाचे संचालक सुमित गांधी, निरंजन हिरानंदानी, हफिज कॉन्ट्रॅक्टर, विकास ओबेरॉय, संदीप रुणवाल, आशीष रहेजा, हॅन्सग्रॉव्ह कंपनीचे ख्रिस्तोफी गोरलॅन, पाओलो रोमानी आदी या वेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *