माहिममध्ये इनोव्हाने पाच गणेशभक्तांना चिरडले

मुंबईतील प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी पायी निघालेल्या पाच गणेशभक्तांना माहीम परिसरात मंगळवारी पहाटे एका भरधाव इनोव्हा कारने जोरदार धडक दिली. या अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अन्य चौघेजण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.

पहाटेच्या आरतीसाठी सिद्धिविनायक मंदिरात जात असताना वांद्र्याहून माहीमच्या दिशेने आलेल्या इनोव्हाने धडक दिली.

घटनेनंतर पोलिसांनी गाडी चालकाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *