पीएचडी बरोबर दुसऱ्या पदवी अभ्यासक्रमास परवानगी नाही

विद्यापीठ अनुदान आयोगाने एकाच वेळी दोन पदवी अभ्यासक्रम करण्याबाबत घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी च्या मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या त्यानुसार एकाच वेळी दोन पदवी अभ्यासक्रम करण्यासंदर्भातील मार्गदर्शन सूचना पीएचडी वगळता अन्य अभ्यासक्रमांना लागू असतील असे यूजीसी ने स्पष्ट केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन पूर्णवेळ शैक्षणिक अभ्यासक्रम करण्याची मुभा देण्याचा निर्णय यूजीसीने एप्रिलमध्ये घेतला होता. त्यानंतर आता या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी विद्यापीठे शैक्षणिक संस्थांनी त्यांच्या रचनेत आवश्यकते बदल करण्याच्या सूचना यूजीसी ने दिल्या. तसेच विद्यार्थ्यांना दोन्ही अभ्यासक्रमाने उपस्थित राहता येण्यासाठी दोन्ही अभ्यासक्रमांच्या वेळा अडचणीच्या ठरणार नाही त्याची दक्षता घेण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन पूर्णवेळाचा अभ्यास करून पदव्या घेता येऊ शकतात. मात्र अभ्यासक्रमांमध्ये वेळेची अडचण होऊ नये या दृष्टीने एका एकाच वेळी दोन पदवी अभ्यासक्रम करताना एक प्रत्यक्ष पदवी अभ्यासक्रम तर दुसरा दूर शिक्षण किंवा ऑनलाईन पदवी अभ्यासक्रम किंवा एकाच वेळी दोन ऑनलाईन किंवा दूर शिक्षण अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल असे नमूद करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *