मुंबई महापालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी तसेच अनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बोनस बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक पार पडली. मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खुशखबर दिली आहे. मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना यंदा 22,500 हजार बोनस मिळणार आहे.
खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटलं की, महापालिका, बेस्ट कर्मचाऱ्यांनी 22500 सानुग्रह अनुदान आणि आरोग्य सेविकांना एक वेतन सानुग्रह अनुदान देण्याचा एतिहासिक निर्णय झाला. गेल्यावर्षी वीस हजार रुपये कर्मचाऱ्यांना बोनस मिळाला होता, मात्र यंदा अडीच हजार रुपये त्यात वाढ करण्यात आली.
सह्याद्री राज्य अतिथीगृह येथील बैठकीस खासदार राहुल शेवाळे, मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. आय. एस. चहल, अतिरिक्त आयुक्त अश्र्विनी भिडे, माजी आमदार किरण पावसकर, महापालिकेतील विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी संदिप देशपांडे, शशांक राव, संतोष धुरी यांच्यासह पालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.