करोनामुळे जवळपास दोन वर्ष आपल्या उत्साहाला मुरड घालावी लागलेल्या दहीहंडी पथकांसाठी आज उत्साहाचा दिवस आहे. कारण कोणत्याही निर्बंधांविना मुंबई, ठाणे, पुणे आणि राज्याच्या इतरही भागांमध्ये दहीहंडी उत्साहात साजरी होत आहे. राज्यात सत्तेची हंडी फोडणाऱ्या सरकारनं दहीहंडी पथकांसाठी जाहीर केलेल्या काही महत्त्वाच्या घोषणांमुळे ही हंडी पथकांसाठी अजूनच आनंदाची ठरणार आहे. एकीकडे दहीहंडीचा उत्साह असताना दुसरीकडे पत्राचाळ प्रकरणात संजय राऊतांशी संबंधित व्यावसायिकांच्या दिशेनं ईडीनं आपला मोर्चा वळवला आहे.
