एकाचवेळी दोन ठिकाणी चित्रीकरण सुरु असेल तर, कलाकारांची प्रचंड दगदग होते. धावपळ होते. सध्या अभिनेत्री प्रियंका चोप्राही अशाच अनुभवातून जात आहे.
चित्रीकरण एकाच शहरात किंवा देशातंर्गत असेल तर, त्रास थोडा कमी होतो पण प्रियंकाला दोन ठिकाणच्या चित्रीकरणाचे वेळापत्र संभाळण्यासाठी परदेशातून ये-जा करावी लागत आहे.
प्रियंका सध्या अमेरिकन टीव्ही शो आणि संजय लीला भन्साळीच्या बहुचर्चित ‘बाजीराव मस्तानी’च्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. मागच्या महिन्याभरापासून प्रियंका कॅनडाच्या मॉनट्रीलमध्ये अमेरिकन टीव्ही शो चे चित्रीकरण करत आहे. आता बाजीराव मस्तानीच्या चित्रीकरणासाठी फक्त तीन दिवसांसाठी ती मुंबईत येणार आहे.
तिच्याकडे असलेल्या इंटरनॅशनल प्रोजेक्टमुळे भन्सालींचा चित्रपट रखडू नये असे प्रियंकाला वाटते यासाठी ती तीन दिवसांचा वेळ काढून चित्रीकरणासाठी मुंबईत येणार आहे. मुंबईला आल्यानंतर तिथले चित्रीकरणही रखडू नये याची प्रियंका काळजी घेत आहे. तिने ओव्हरटाईम काम करुन काही दुश्यांचे चित्रीकरण आटोपले. मुंबईतही ती सलग तीन दिवस चित्रीकरण करणार आहे असे सूत्रांनी सांगितले.

