औरंगाबाद शहरात स्वाइन फ्लूचा दुसरा बळी

औरंगाबाद शहरात स्वाइन फ्लूचा दुसरा बळी गेलाय. सिडको एन-४ इथल्या महिलेचा स्वाईन फ्लूनं मृत्यू झालाय.

पूनम हरिओम गुप्ता असं या महिलेचं नाव आहे. धूत हॉस्पिटलमध्ये या महिलेवर उपचार सुरु होते. उपचारा दरम्यान या महिलेचा मृत्यू झालाय. स्वाईन फ्लूचा विळखा वाढत असताना महापालिका मात्र निद्रिस्त असल्याचं दिसून येतोय.

कोकणातही साथ
दरम्यान, ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वाईन फ्लूची साथ जाहीर झालीये… स्वाइन फ्ल्यूनं काल दोघांचा मृत्यू झाला असून रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतेय.

सोनवडेपार आणि नेरुर नदीकिना-यावरच्या दोन गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. राज्याचे आरोग्य मंत्री दीपक सावंत सिंधुदुर्गातले असूनही जिल्ह्यात लोकांच्या आरोग्याची प्रचंड हेळसांड होतेय.

गणपतीला मुंबईसह राज्यभरातून चाकरमानी मोठ्या संख्येनं कोकणात जात असतात. मात्र ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर जिल्ह्यात स्वाइन फ्लूनं तोंड वर काढलं असताना जिल्हा प्रशासन मात्र ढिम्मच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *