बीकेसीमध्ये आरबीआयच्या इमारतीला आग

बीकेसीमध्ये आरबीआयच्या इमारतीला आग

मुंबईमधील वांद्रे-कुर्ला संकुलातील आरबीआयच्या इमारतीला शुक्रवारी सकाळी आग लागली. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

बीकेसीमधील रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या आठव्या मजल्यावर शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच आग्निशमन दलाच्या आठ गाड्या आणि पाण्याचे सहा टॅंकर घटनास्थळी दाखल झाले.

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांचे प्रयत्न सुरू आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *