धोनी, सेहवाग आणि आफ्रिदी एकाच संघातून खेळणार

धोनी, सेहवाग आणि आफ्रिदी एकाच संघातून खेळणार

इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर एक क्रिकेट सामना होणार आहे. आता तुम्ही म्हणाल, क्रिकेट सामना होणार, यात विशेष ते काय? पण विशेष आहे. कारण या क्रिकेट सामन्यात महेंद्रसिंग धोनी, विरेंद्र सेहवाग आणि पाकिस्तानचा ऑलराऊंडर शाहिद आफ्रिदी एकाच संघातून खेळणार आहेत.

हेल्प ऑफ हिरो’ या संघातून धोनी, सेहवाग आणि आफ्रिदी खेळणार आहेत. 17 सप्टेंबरला इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर होणारा हा सामना एका समाजसेवी संस्थेला मदतनिधी मिळवून देण्यासाठी खेळवला जाणार आहे.

धोनी, सेहवाग आणि शाहिद आफ्रिदीच्या टीमचा कर्णधार अँड्रू स्ट्रॉस असणार आहे. तर विरोधी संघाचा  म्हणजेच ‘रेस्ट ऑफ द वर्ल्ड’चा कर्णधार ब्रँडन मॅक्युलम असेल.

“दिग्गज खेळाडू असलेल्या संघात म्हणजे हेल्प ऑफ हिरोजमधून खेळणं माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. इंग्लंडमध्ये खेळणं मला पहिल्यापासूनच आवडतं.”, असे यावेळी बोलताना महेंद्रसिंग धोनी म्हणाला.

‘हेल्प ऑफ हिरोज’ टीममध्ये कोण-कोण असेल?

अँड्रू स्ट्रॉस (कर्णधार), हर्शल गिब्ज, विरेंद्र सेहवाग, एम एस धोनी, डॅमियन मार्टिन, ल्यूंटेंट कमांडर जोनाथन पार्कर, कॉरपॉरल जेक व्रे, शाहिद आफ्रिदी, ग्रॅमी स्वान, सायमन जोन्स, मॅथ्यू होगार्ड, हॅरेन वॉ

टीम मॅनेजर – इयान बॉथम

‘रेस्ट ऑफ द वर्ल्ड’ टीममध्ये कोण-कोण असेल?

ब्रँडन मॅक्युलम (कर्णधार), मॅथ्यू हेडन, ग्रॅमी स्मिथ, माहेला जयवर्धने, मेजर स्टॉर्म ग्रीम, ब्रायन लारा, अब्दुल रझाक, स्कॉट स्टायरिस, डेनियल व्हेटोरी, टीम साउथी, शापूर जार्डन
टीम मॅनेजर : सुनील गावसकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *