कोल्हापुरातील अँटी करप्शन विभागानं दोन लाख रुपयांची लाच घेताना सहाय्यक नगररचना अधिकारी समीर जगताप याला रंगेहात अटक केली.
जगताप यांनी तक्रारदार मालकाला सात बारा पत्रकावर नाव लावण्याचे शिफारस पत्र देण्यासाठी दहा लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदारानं 2 लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली. त्याचवेळी त्यांनी ही बाब कोल्हापूर अँटी करप्शन विभागाला कळवली.
आज सकाळी एसीबीच्या पथकानं नगररचना कार्यालयात सापळा रचून सहाय्यक नगररचना अधिकारी समीर जगताप याला लाच घेताना रंगेहात पकडले.
