12 वीच्या पेपरसाठी जामीनावर बाहेर आला आणि खून करून फरार झाला

शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका खूनप्रकरणी अटकेत असलेला आरोपी 12 वीचे पेपर देण्यासाठी तुरूंगातून बाहेर आला. पण त्याच्यातील खुनशी वृत्ती अजूनही तशीत होती. तुरूंगातून बाहेर येताच त्याने पुन्हा एका तरुणाचा खून केला आणि फरार झाला.

सांगलीत राज पाटील या गुन्हेगाराला एका खूनप्रकरणी काही दिवसांपूर्वी अटक झाली होती. त्याने 12 वीची परीक्षा देण्याच्या निमित्ताने तुरूंगप्रशासनाकडे जामीन मागितला होता. परीक्षा देण्यासाठी तो कारागृहा बाहेर आला. परंतू बाहेर येऊनही त्याने आपली खुनशी वृत्ती सोडली नाही.

राजने जामीनावर बाहेर पडल्यावर रोहन नाईक नावाच्या तरुणाचा खून केला.  या खूनप्रकरणी चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यातील दोघांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील मुख्य संशयित आऱोपी असलेल्या राज पाटील मात्र फरार आहे. सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *