एटीएममध्ये पिन टाकण्याआधीच पैसे गायब

एटीएममध्ये पिन टाकण्याआधीच पैसे गायब

तनु वेड्स मनु, रांझणा या सिनेमांमधील अभिनेत्री स्वरा भास्कर सायबर क्राईमची बळी ठरली आहे. स्वराने नवी मुंबईतील एका मॉलमध्ये एटीएममधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. पण तो अयशस्वी ठरला. मात्र काही वेळाने अकाऊंटमधून 20 हजार रुपये काढल्याचा मेसेज तिच्या फोनवर आला. मात्र एटीएम पिन एन्टर न करताच पैसे काढल्याने तिला धक्का बसला.

स्वरा सध्या आगामी ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. सलमान खानची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाचं शूटिंग कर्जतमध्ये सुरु आहे. शूटिंग संपल्यानंतर ती हॉटलेला परतत होती. मात्र खारघरमधील एका मॉलमधील एटीएममधून पैसे काढण्यासाठी थांबली.

एटीएम फार स्लो होतं आणि तिथेच असलेल्या दोन इसमांनी तिला सांगितलं की, एटीएम व्यवस्थित काम करत नाही. त्यामुळे पैसे न काढताच ती तिथून निघून गेली. पण कारजवळ पोहोचताच तिला मेसेज की, अकाऊंटमधून 20 हजार रुपये काढण्यात आले आहेत. एटीएम पिन टाईप न करताच पैसे काढल्याने तिला धक्काच बसला.

स्वरा भास्करने खारघर पोलिस ठाण्यात या प्रकाराची तक्रार दाखल केली आहे.

“एटीममध्ये कार्ड टाकताच मशीन हँग झालं आणि त्यानंतर दोन इसमांनी मला एटीएम व्यवस्थित काम करत नाही आहे, त्यामुळे  पैसे काढू नका असा सल्ला दिला. मी पिन एन्टर न करताच कोणीतरी पैसे काढले, माझं अकाऊंट हॅक झालं असावं. मी सायबर क्राईम सेल आणि बँकेच्या अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार दाखल केली आहे,” असं स्वरा भास्कर म्हणाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *