माहेरहून हुंडा आणला नाही म्हणून सासरच्यांनी विवाहितेला पाजले अॅसिड

फ्लॅटचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये न आणल्याने सासरच्यांनी विवाहितेला फरशी साफ करण्याचे अ‍ॅसिड पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना हांडेवाडी येथे समोर आली. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत फिरदोस रेहान काझी (वय २३, रा. सय्यदनगर, हडपसर) यांनी तक्रार दिली. त्यानुसार पती रेहान काझी, सासू नजमा काझी, नणंद गजाला काझी आणि हिना शेख यांच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. हांडेवाडी येथे बारा फेब्रुवारीला ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिरदोस आणि रेहान पती-पत्नी आहेत. विवाहनंतर दोघेही हांडेवाडीत राहतात. काही महिन्यांपूर्वी रेहानने फ्लॅट खरेदी केला होता. त्याचे कर्ज फेडण्यासाठी सासरच्यांनी फिरदोस यांना माहेरहून दोन लाख रुपये आणण्याचा तगादा लावला. वारंवार सांगूनही रक्कम न आणल्याने रेहान, नजमा, गजाला, हिना यांनी मिळून फिरदोस यांना फरशी साफ करण्याचे ऍसिड पाजून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर फिरदोस यांना तत्काळ उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यानंतर या याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी कोंढवा पोलिस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *