ईडी कोठडीत असलेल्या नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात केलं दाखल

महाविकास आघाडी सरकारमधले मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना मनी लॉन्ड्रींगप्रकरणी  ईडीने (ED) अटक केली. बुधवारी 8 तासांच्या चौकशीनंतर ईडीने अटकेची कारवाई केली. त्यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, नवाब मलिक यांना मुंबईतल्या जे जे रुग्णालयात (JJ Hospital) दाखल करण्यात आलं आहे. नवाब मलिक यांना पोटदुखीचा त्रास होत असल्याने त्यांना आज तपासणीसाठी जे जे रुग्णालयात नेण्यात आलं. पोटदुखीची समस्या वाढल्याने नवाब मलिक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

नवाब मलिक ईडी कोठडीत
मनी लॉण्ड्रींग प्रकरणी अटक करण्यात आलेल्या इक्बाल कासकर याच्या चौकशीदरम्यान नवाब मलिक यांचं नाव समोर आलं होतं. त्यानंतर 23 फेब्रुवारीला सकाळी ईडीचे अधिकारी मलिक यांच्या घरी दाखल झाले. त्यानंतर त्यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलवण्यात आलं. तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक अटक करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *