पिंपरी चिंचवडमध्ये WhatsAppवर सेक्स रॅकेट, रात्रीत २० हजार कमवणाऱ्या त्या मुली कुठल्या?

पिंपरी चिंचवडमध्ये WhatsAppवर सेक्स रॅकेट सुरु होतं, यात या मुली दिवसाला ८ ते ९ हजार आणि रात्री २० हजार रुपये कमवत होत्या. पण या मुलींकडून हा देहव्यापार जबरदस्तीने केला जात होता. या मुलींची अखेर पोलिसांनी सुटका केली आहे, या मुली मुंबई किंवा पुण्याच्या नव्हत्या या दिल्लीच्या होत्या, आम्हाला डांबून ठेवून ही कामं केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यातील २ मुली दिल्लीच्या आणि १ छत्तीसगडची होती. जॅक, बबलू आणि करन नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.

हॉटेल कामिनी येथे कुणालाही न समजू देता जबरदस्तीने हे व्यक्ती या मुलींकडून वेश्या व्यवसाय करुन घेत होते, दिवसा ग्राहकांकडून ८ ते ९ हजार आणि रात्रीसाठी २० हजार रुपये घेत होते. हे व्यक्ती WhatsAppवर या मुलींचे फोटो पाठवायचे, फोटो पसंत करा आणि सांगितलेल्या ठिकाणी या असं सांगून हे सर्व सुरु होतं.

पोलिसांकडे ही तक्रार आल्यानंतर पोलिसांनी खातरजमा करुन, या ठिकाणी धाड टाकल्यावर हा प्रकार समोर आला आहे. सेक्स रॅकेट चालवण्याच्या आरोपावरुन ३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *