पुण्यात पिण्याच्या पाण्याचा मुद्दा पेटणार, ‘या’ भागातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद

 पुणेकरांचे पाणी महागण्याची शक्यता आहे. जलसंपदा विभागाने तब्बल 5 पटीने पाण्याचे दर वाढवण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत पुण्यात पाण्याचा मुद्दा पेटणार असे दिसत आहे. प्रति 1000 लीटरसाठी 30 पैसे इतकी पाणीपट्टी होती. आता नव्या प्रस्तावित दरानुसार 1000 लीटरसाठी दीड रूपया मोजावा लागेल.

दरम्यान, पुण्यात दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. लष्कर जलकेंद्राच्या भागातील सोमवार पेठ ते नरपतगिरी चौक ते 15 ऑगस्ट चौक तर लष्कर पाणीपुरवठा जलकेंद्र अंतर्गत रामटेकडी मुख्य जलवाहिनीचे काम करण्यात येणार आहे. गुरुवारी दि. 24 फेब्रुवारी रोजी हडपसर परिसरासह, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, रास्ता पेठ, कोरेगाव पार्क मुंढवा भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच लष्कर जलकेंद्रअंतर्गत रामटेकडी विभागामधील संपूर्ण परिसरात पाणी बंद राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *