लोणावळय़ात संतापाचा उद्रेक; नागरिकांकडून रास्ता रोको

लोणावळा शहरातून जाणाऱ्या अवजड वाहनांची वर्दळ, वाढते अपघात तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि आयआरबी कंपनीकडून कामात होणाऱ्या दिरंगाईमुळे नागरिक रविवारी सकाळी अकराच्या सुमारास रस्त्यावर उतरले.

जु्न्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर नागरिकांनी एक तास रास्ता रोको आंदोलन केले. लोणावळा शहरातून जाणाऱ्या अवजड वाहतुकीवर सकाळी सात ते रात्री नऊपर्यंत बंदी घालण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर नागरिकांनी तासभर सुरू असलेले रास्ता रोको आंदोलन मागे घेतले.

लोणावळा शहरातून रात्रीच्या वेळी जाणाऱ्या अवजड वाहतुकीवर बंदी घालण्यासाठी नागरिकांनी केलेल्या मागणीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येईल तसेच वळवण ते खंडाळा दरम्यानची वाहतूक द्रुतगती मार्गावर वळविण्याची मागणी प्रशासनाकडून मान्य करण्यात आली.  आठवडय़ापूर्वी नागरिकांनी प्रशासन तसेच पोलिसांना पत्र देऊन विविध मागण्यांकडे  लक्ष वेधले होते.  आंदोलनात सहभागी झालेले नागरिक तसेच सर्वपक्षीय कार्यकर्त्यांशी अधिकाऱ्यांनी चर्चा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *