ना वारा ना पाऊस, नदीला आला मोठा पूर;

कोल्हापूरातील राधानगरी धरणाचे दरवाजा तांत्रिक काम करत असताना उघडून अडकला असल्याने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग अचानक वाढला आहे.

धरणाचा दरवाजा तांत्रिक कामानिमित्त उघडण्यात आला परंतू तो अडकल्याने उघडाच राहिला आहे. त्यामुळे भोगावती नदी पात्रात पाण्याचा अचानक विसर्ग वाढला आहे.

दरम्यान, प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदी काठावरील गाव, नदीवर जनावर, धुणे धुवायला जाणाऱ्या व्यक्तींना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *