नागपूरच्या चालकाची हत्या करून कॅब पळवणाऱ्या तिघांना अखेर अटक

औरंगाबाद जिल्ह्यात करमाडजवळील गोलटगाव शिवारात झालेल्या  पोलिसांना यश आलं आहे. औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. तिघेही आरोपी लातूरच्या औसा तालुक्यातील रहिवासी आहेत. आरोपींनी हत्या केलेला तरुण चालक नागपूर येथील रहिवासी होता. आरोपींनी त्याची हत्या करून त्याच्या ताब्यातील वाहन (कॅब) पळवून नेल्याची माहितीही समोर आली आहे. पोलीस अधीक्षक निमित्त गोयल यांनी याबाबत सोमवारी (१० जानेवारी) औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी ग्रामीण पोलिसांनी २०२१ मध्ये केलेल्या कामगिरीचीही माहिती देण्यात आली.

या प्रकरणात पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं विशाल राजेंद्र मिश्रा, शिवाजी दत्तू बनसोडे आणि सुदर्शन जनकनाथ चव्हाण अशी आहेत. विशाल वासुदेव रामटेके (वय ३२, रा.नागपूर) असं हत्या झालेल्या पीडित तरुणाचे नाव आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *