वाढत्या कोरोनामुळे 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांबाबत मोठी बातमी; वेळापत्रकाबाबत शिक्षण मंडळाचे स्पष्टीकरण

राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अनेक निर्बंध लागू झाले आहेत. 10 वी आणि 12 वी वगळता सर्व वर्ग 15 फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे 10 वी आणि 12 वी च्या बोर्डाच्या परीक्षा होणार की नाही याबाबत पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. परंतू राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने याबाबत खुलासा केला आहे.

राज्यातील 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांसमोर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने अनेक प्रश्न उभे केले आहेत. राज्यात कोरोना प्रतिबंधासाठी अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. दरम्यान 10 वी आणि 12 वी वगळता इतर सर्व वर्गांना 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे यावर्षीदेखील परीक्षा पुढे ढकलल्या जातात का? की वेळापत्रकानुसारच होणार याबाबत पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *