‘दुसरा गाल पुढे केल्यावर स्वातंत्र्य नाही तर भीक मिळते’, कंगनाने उडवली महात्मा गांधींची खिल्ली

सुभाषचंद्र बोस आणि भगत सिंग यांना महात्मा गांधींकडून पाठिंबा मिळाला नसल्याचा दावा करत कंगना रणौत ने मंगळवारी नव्या वादाला तोंड फोडले. तिने गांधींच्या अहिंसेच्या तत्त्वांची खिल्ली उडवत म्हटलं की दुसरा गाल पुढे करून ‘भीक मिळते’ स्वातंत्र्य मिळत नाही. रणौतने गेल्या आठवड्यात म्हटले होते की, भारताला १९४७ मध्ये भीक मिळाली होती स्वातंत्र्य मिळालं नव्हतं. खरं स्वातंत्र्य २०१४ मध्ये नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यावर मिळालं

इन्स्टाग्रामवर एकामागून एक पोस्ट करत रणौतने महात्मा गांधींवर निशाणा साधत लोकांना नायक समजूतदारपणे निवडण्याचाही सल्ला तिने यावेळी दिला. कंगनाने एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली बातमी शेअर केली. ज्यात ‘गांधी यांनी बोस यांना इंग्रजांकडे सोपवण्याची तयारी दाखवली होती.’ या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की एका ब्रिटीश न्यायाधीशाकडे गांधी, जवाहरलाल नेहरू आणि मोहम्मद अली जीना यांनी सुभाषचंद्र बोस भारतात आले तर त्यांना ताब्यात देण्याची तयारी दाखवली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *