गुलाब चक्रीवादळामुळे मराठवाडा, विदर्भात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झालं आहे. औरंगाबाद शहरात अजूनही पावसाचा जोर कायम आहे. शहरात पहाटे ढगफुटी सदृश्य पावसाने पुन्हा एकदा औरंगाबादला झोडपले आहे. त्यामुळं नदीला मोठा पूर आला असून गावांत पाणी शिरले आहे.
गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादला मुसळधार पावसाने झोपडले आहे. मुसळधार पावसामुळं नदी- नाले दुधडी भरुन वाहत आहेत. तर, जायकवाडीसह अन्य धरणदेखील पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. तर, नद्यांचे पाणी शेतात शिरल्याने पिकांचे नुकसान झालं आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याना नागरिकांना थोडा दिलासा मिळाला होता. मात्र, शहरात आज पहाटे पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावली आहे. पहाटे तीन- चारच्या दरम्यान विजेच्या कडकडाटासह शहरात मुसळधार पाऊस कोसळला. अर्धा ते पाऊण तास पडलेल्या पावसाने संपूर्ण रस्ते जलमय झाले आहेत.
