मुंबईसह देशभरात खळबळ उडवणा-या शीना बोराच्या हत्याप्रकरणाचे गूढ वाढतच चालले आहे. दररोज या प्रकऱणी नवनवीन खुलासे उघड होत आहेत. शीना बोरा हत्याप्रकरणी आज शीनाचा भाऊ मिखेल बोराला मुंबईला आणण्यात येत आहे. यावेळी त्याची याप्रकरणी चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.
या प्रकरणी इंद्राणी मुखर्जीचा पहिला पती संजीव खन्ना यालाही आज मुंबई न्यायालयासमोर हजर करण्यात येण्याची शक्यता आहे.
इंद्राणी मुखर्जीचा मुलगा असण्याचा दावा करणा-या मिखेल बोराने आपल्याकडे बहिण शीनाच्या हत्येसंबंधित काही पुरावे असल्याची माहिती गुरुवारी प्रसारमाध्यमांना दिलीहोती. त्याआधी मुंबई पोलिसांनी गुवाहाटी येथे जाऊन आरोपी इंद्राणी मुखर्जीचा मुलगा मिखेल बोराची चौकशी केली होती.
खार पोलीस ठाण्यात इंद्राणी, तिचा चालक आणि राहुल मुखर्जी यांची चौकशी केल्यानंतर हत्येमागे काय हेतू होता याबाबत आम्हाला स्पष्ट कल्पना आली आहे. मात्र तिस-या आरोपी(संजीव खन्ना, इंद्राणी मुखर्जींचा आधीचा पती) मुंबईत पोहोचलेले नाहीत. त्यांची चौकशी होणे बाकी आहे. त्यांची चौकशी केल्यानंतर याबाबतची अधिक माहिती आम्ही देऊ शकतो. असे मुंबई पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी सांगितले.

