ट्रेन लेट होण्यावरून सुप्रीम कोर्टाने रेल्वेला फटकारलं आहे. ट्रेन लेट होण्याच्या जबाबदारीपासून रेल्वे पळ काढू शकत नाही. यामुळे एखाद्या प्रवाशाचे नुकसान होत असेल तर रेल्वेने नुकसान भरपाई देण्यास सज्ज राहिलं पाहिजे. ट्रेन लेट झाल्याच्या एका प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. या प्रकरणी प्रवाशाला ३०, ००० रुपये नुकसान भरपाई द्या, असे आदेश सुप्रीम कोर्टाने रेल्वेला दिले.
सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती एम. आर. शहा आणि अनिरुद्ध बोस यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली आहे. रेल्वे गाड्यांच्या होणाऱ्या विलंबाला रेल्वे जबाबदार आहे आणि रेल्वेला ही जबाबदारी झटका येणार नाही, असं खंडपीठाने म्हटलं. ट्रेनच्या विलंबाचं ठोस कारण देण्यास रेल्वे अपयशी ठरत असेल तर प्रवाशांना नुकसान भरपाई द्यावी लागेल. प्रवाशांचा वेळ बहुमूल्य आहे. यामुळे ट्रेनच्या होणाऱ्या विलंबाला कुणाला तरही उत्तरदायी व्हावचं लागेल, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं

