इंद्राणीच्या ड्रायव्हरकडून हत्येची कबुली

इंद्राणीच्या ड्रायव्हरकडून हत्येची कबुली

शीना बोराच्या हत्या प्रकरणी मोठा उलगडा झालेला आहे. 24 एप्रिल 2012 रोजी शीनाची गळा आवळून हत्या केल्याची कबुली इंद्राणीच्या ड्रायव्हरने दिली आहे, मुंबईचे पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी यांसंदर्भात माहिती दिली आहे.

गाडीमध्ये गळा आवळून शीनाची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पेट्रोल टाकून तिचा मृतदेह रायगडजवळ जाळण्यात आला. शीनाची हत्या झाली, त्यावेळी इंद्राणी गाडीत असल्याची माहितीही ड्रायव्हरने दिली आहे. शीनाचा मृतदेह 23 मे 2012 रोजी रायगडजवळ आढळून आला होता.

हत्येप्रकरणी मंगळवारी स्टार इंडियाचे माजी सीईओ पीटर मुखर्जी यांची पत्नी इंद्राणीला अटक करण्यात आली होती. तर इंद्राणीचा दुसरा पती संजीव खन्ना याला बुधवारी कोलकातामधून अटक झाली आहे. संजीव अलीपूरमध्ये मित्राच्या घरी लपला होता.

अपहरण आणि कारमध्येच हत्या

वांद्र्याच्या नॅशनल कॉलेजबाहेरुन शीना बोराचं अपहरण करुन कारमध्येच गळा आवळून तिची हत्या केली. वाद मिटवण्यासाठी इंद्राणीने शीनाला मेसेज करुन वांद्र्याला बोलावलं होता, असं म्हटलं जात आहे.

पतीची फसवणूक

इंद्राणी मुखर्जीने पती पीटर मुखर्जी यांनाही अंधार ठेवल्याचं आता उघड झालं आहे. पहिलं लग्न लपवण्यासाठी, स्वत:च्या मुलीला बहिण सांगून, इंद्राणीने पती पीटर यांना अंधारात ठेवलं.

इंद्राणीची मुलगी आणि पीटर मुखर्जींच्या मुलाचं प्रेमप्रकरण

या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, इंद्राणीची मुलगी शीना आणि पीटर मुखर्जींच्या मुलाचं प्रेमप्रकरण होतं. म्हणजे इंद्राणी आणि पीटर या पती-पत्नींच्या मुलांचे आपापसात प्रेमसंबंध होते.

त्या माय-लेकीच

शीनाचा भाऊ मिखाईल बोरानेही शीना आणि इंद्राणी या माय-लेकीच असल्याचा दावा केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *