गरिबी आणि बेरोजगारीचं वृत्तांकन करतो म्हणून तालिबानकडून पत्रकाराला बेदम मारहाण

गरिबी आणि बेरोजगारीचं वृत्तांकन करतो म्हणून तालिबानकडून पत्रकाराला बेदम मारहाण

अफगाणिस्तानमधील पहिली स्वतंत्र वृत्तवाहिनी असणाऱ्या टोलो न्यूजच्या पत्रकाराची तालिबानने हत्या केल्याची बातमी कंपनीने दिली. मात्र थोड्याच वेळात या पत्रकाराने ट्विटरवरुन खुलासा करत आपल्याला बेदम मारहाण करण्यात आल्याचं म्हटलं असून आपले प्राण वाचल्याचं स्पष्ट केलं आहे. सर्वात आधी या मारहाणीसंदर्भात टोलो ग्रुपने माहिती दिली आणि त्यानंतर अनेक प्रसारमाध्यमांनी यासंदर्भातील वृत्तांकन केल्यानंतर या पत्रकाराचे ट्विट समोर आले आणि तो जिवंत असल्याचं स्पष्ट झालं. या पत्रकाराला देशाची राजधानी असणाऱ्या काबूलमध्ये मारहाण झाली.

झिअर याद खान असं मारहाण करण्यात आलेल्या पत्रकाराचं नाव आहे. खान आणि एका कॅमेरामन काबूलमधील बेरोजगारी, गरीबी आणि दारिद्र्य या विषयावर वृत्तांकन करत होते. त्यावेळी तालिबान्यांनी त्यांना पकडलं आणि बेदम मारहाण केली. हजी याकूब परिसरामध्ये ही घटना घडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *