मुंबईत पेट्रोल १७ पैशांनी स्वस्त

मुंबईत पेट्रोल १७ पैशांनी स्वस्त

पेट्रोल आणि डिझेल रविवारी २० पैशांनी स्वस्त झाले. पेट्रोलच्या दरात गेल्या महिनाभरात झालेली ही पहिली घट आहे, तर डिझेलचे दर आठवडाभरात चौथ्यांदा २० पैशांनी घसरले आहेत. नव्या दरघसरणीमुळे मुंबईतील पेट्रोल दरात १७ पैशांनी, तर डिझेल दरात २० पैशांनी घट झाली आहे. मुंबईत पेट्रोलचा दर आता १०७ रुपये ६६ पैसे, तर डिझेलचा दर ९६ रुपये ६४ पैसे झाला आहे. ठाणे आणि नवी मुंबईतील पेट्रोलचा दर १०७ रुपये ८० पैसे, तर डिझेलचा दर ९६ रुपये ७७ पैसे झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *