पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून जावयाची आत्महत्या

पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून जावयाची आत्महत्या

पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून जावयाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणाने राहत्या घरी पत्नीच्या ओढणीने गळफास घेत आयुष्य संपवलं. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईट नोटमध्ये तरुणाने सासुरवाडीच्या जाचाला कंटाळून तसंच कर्जबाजारी झाल्यामुळे आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला आहे. यावेळी त्याने पत्रात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा उल्लेख करत कडक कारवाईची मागणी केली आहे.

निखिल धोत्रे असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. पुण्यातील शिवाजीनगर-गोखलेनगर भागात तो वास्तव्यास होता. वर्षभरापूर्वीच त्याचं लग्न झालं होतं. निखिलने रविवारी संध्याकाळी राहत्या घरी पत्नीच्या ओढणीने गळफास घेत आयुष्य संपवलं. दरम्यान पोलिसांनी सुसाईड नोट सापडली असून यामध्ये त्याने सासुरवाडीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला आहे. तसंच कर्जबाजारी झाल्याचाही उल्लेख केला आहे.

निखिलने पत्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा उल्लेख केला असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसंच ‘ आई तू काळजी करु नकोस, मी पुन्हा तुझ्या पोटी जन्म घेईन’ मी समजून माझ्या बाळाला संभाळ, त्याची काळजी घे”, असंही चिठ्ठीत लिहिलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *