चंद्रपूर भद्रावती आयुध निर्माणी चांदा येथील केंद्रीय विद्यालय वसाहत परिसरात पट्टेदार वाघ आणि बिबट्या या दोघांच्या झालेल्या झुंजीत बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना १९ ऑगस्टला दुपारी ३ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
या घटनेची माहिती वनविभागाला मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी हरिदास शेंडे व त्यांच्या चमूने घटनास्थळी पोहचून पंचनामा केला.सदर बिबट्या हा अंदाजे ७ ते ८ वर्षाचा असून त्याचा मृत्यू पट्टेदार वाघ व बिबट्या या दोघांच्या संघर्षात झाला असावा असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्याचं शव उत्तरीय तपासणी पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. कोलचलवार व डॉ.शेडमाके यांनी केल्यानंतर चंद्रपूर येथील टीटीसी केंद्रात शवाचे अग्नी दहन करण्यात आले. घटनेचा पुढील तपास वनविभाग करीत आहे.