राष्ट्रपती पळून गेले पण हा अधिकारी म्हणाला तोपर्यंत अफगाणिस्तान सोडणार नाही !

राष्ट्रपती पळून गेले पण हा अधिकारी म्हणाला तोपर्यंत अफगाणिस्तान सोडणार नाही !

अफगाणिस्तानवर (Afghanistan) तालिबानने ताबा घेतल्यानंतर, (Taliban in Afghanistan) जिथे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोक भीतीच्या छायेखाली आहेत. (Situation in Afghanistan) अनेक लोक घाबरुन देश सोडून जाण्यासाठी विमानतळावर गर्दी करत आहेत. त्याठिकाणी चेंगराचेंगरी झाली आहे. मात्र, येथील ब्रिटिश राजदूताने ( British ambassador) काबूलमध्येच (Kabul)  राहण्याचा निर्णय घेतला आहे.

आपल्या जीवाची काळजी न करता, राजदूत सर लॉरी ब्रिस्टो (Sir Laurie Bristow) यांनी स्पष्ट केले आहे की जोपर्यंत 4000 ब्रिटिश आणि अफगाणिस्तानातील जवानांना सुरक्षित बाहेर काढले जात नाही, तोपर्यंत ते अफगाणिस्तान सोडणार नाहीत आणि कुठेही जाणार नाहीत. त्याच्या धाडसाबद्दल राजदूतचे सर्वत्र कौतुक होत आहे. ब्रिटनच्या लोकांनी त्याला नायक म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *