राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस

राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस

विदर्भासह राज्यात विविध ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दडी मारल्यानंतर पाऊस पुन्हा सक्रीय झाला आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात ऑरेंज अलर्ट  तर कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात हवामान विभागाने यलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पावसाचे राज्यात दमदार कमबॅक झाले आहे. मराठवाडा आणि विदर्भात तुफान पाऊस झाला आहे. परभणी, नांदेड, अकोला, वर्धा, भंडाऱ्यामध्ये तुफान पाऊस झाला आहे. जवळपास महिनाभरानंतर पाऊस बसरला आहे. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यावर दुबार पेरणीची वेळ आली होती. पण या पावसाने शेतकऱ्याला मोठा दिलासा दिला आहे.

गेल्या महिन्यात झालेल्या पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना महापूराचा फटका बसला होता. आता पुन्हा राज्यात मुसळधार पाऊस पडण्यााच अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानुसार पाऊस सुरु झाला आहे. आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्रात येत्या 48 तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.  तसेच मराठवाडा, कोकण, आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *