मोबाइल चोरीसाठी लोकलमध्ये महिला प्रवाशाला मारहाण

मोबाइल चोरीसाठी लोकलच्या महिला डब्यातील एका प्रवाशाला चोराने जबर मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. धावत्या लोकलच्या महिला डब्यात घडलेल्या या घटनेनंतर महिलेने लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार दाखल केली. बोरिवली लोहमार्ग पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक के ली.

अटक केलेल्या २१ वर्षीय आरोपीचे नाव आकाश धोडे आहे. १२ ऑगस्टला ही घटना घडली होती. ज्युली जयस्वाल (२४) या वसई पश्चिमेला दीनदयाळ नगरमध्ये राहतात. १२ ऑगस्टला मालाड येथून मासे खरेदी करून वसईला जाण्यासाठी त्या बोरिवली स्थानकात आल्या. फलाट क्र मांक चारवर आलेली सकाळी ७.५७ वसई जलद लोकलच्या द्वितीय श्रेणीच्या महिला डब्यातून त्यांनी प्रवासाला सुरुवात के ली. त्यावेळी डब्यात त्या एकट्याच असल्याचे पाहून आकाश धोडेनेही त्या डब्यात प्रवेश के ला. त्याने त्वरित डाव्या हाताने ज्युली यांच्या गळ्याला पकडून आणि उजव्या हाताने त्यांच्या गालावर, कपाळावर आणि कानाजवळ तसेच छातीवर बुक्क्यांनी मारहाण के ली. मारहाण करत असतानाच त्यांच्या जवळील मोबाइल व रोख रक्कम चोरून वसई स्थानक येण्यापूर्वीच लोकलमधून उडी मारून पळ काढला.  या घटनेनंतर त्यांनी त्वरित लोहमार्ग पोलीस ठाण्यात धाव घेतली व घडलेली घटना सांगून तक्रार दिली. दाखल गुन्ह्र्थ्यांयातील फलाटांवरील सीसीटीव्ही फु टेजचीही तपासणी केली आणि खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे आकाशला १३ ऑगस्टला वसई रेल्वे स्थानक पूर्वेकडील शहर हद्दीतून ताब्यात घेतले. तो जोगेश्वरी येथील रहिवाशी आहे. आकाशला न्यायालयात हजर के ले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *