चोर समजून एका व्यक्तीला बेदम मारहाण; पोलीस ठाण्यातच सोडला जीव

चोर समजून एका व्यक्तीला बेदम मारहाण; पोलीस ठाण्यातच सोडला जीव

नवी मुंबईतील कोपरखैरणे भागात रात्री उशिरा चोर समजून एका व्यक्तीला रहिवाशांनी बेदम मारहाण केली. त्या व्यक्तीला पोलीस ठाण्यात आणले मात्र काही वेळात त्याचा मृत्यू झाला. मयत व्यक्तीचे नाव दिनेश चव्हाण असून कोपरखैरने सेक्टर ५ येथे राहण्यास आहे. गुरुवारी अपरात्री तो सेक्टर १९ येथून जात असताना त्याला चोर समजून तेथे उभ्या असलेल्या काही जणांनी बेदम मारहाण केली. हा आरडा ओरडा ऐकून लोकही जमले त्यांनीही चोर समजून त्याला मारहाण केली.

यावेळी लोक एवढे बेफान झाले होते. रस्त्यावर पडलेले बांबू ,दगडांनी त्याला मारले. तेथिलच काही जागरूक नागरिकांनी याबाबत पोलीस कंट्रोल रूमला माहिती दिली त्यामुळे काही वेळातच कोपरखैरणे पोलीस घटनास्थळी पोहचले व तेथील काही व्यक्तींची मदत घेऊन पोलीस ठाण्यात नेले. त्याला पोलीस ठाण्यात नेल्यावर ठाणे अंमलदार कक्षात बसवण्यात आले. मात्र काही वेळात त्याला उलटी व जुलाब सुरू झाले थोडा वेळ खुर्चीत बसला असता तो कोसळला. पोलिसांनी त्याला मनपा रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याला मृत घोषित केले. वास्तविक मयत चव्हाण नक्की चोरच होता की नाही या तपास सुरू आहे.

एवढी मारहाण झाल्यावर त्याला रुग्णालयत अगोदर घेऊन जाणे गरजेचे होते. त्यातच पोलीस ठाण्यात त्याचा मृत्यू झाल्याने उलटसुलट चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे. याच विषयी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात चार तासापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठक सुरू आहे. त्यामुळे सरसगट सर्वांना पोलीस ठाण्यात येण्यास मनाई केली गेली आहे. अन्य तक्रादारांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान या घटनेचे पडसाद उमटू शकतात म्हणून राखीव पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *