जुहूच्या किनाऱ्यावर मृत पॉरपॉइज मासा

मुंबई : जुहूच्या समुद्रकि नाऱ्यावर शुक्रवारी मृत पॉरपॉइज मासा आढळला. साडेचार फू ट लांबींच्या या पॉरपॉइजचे वजन ७० ते ७५ किलो होते. मृत्यूनंतर काही दिवसांनी किनाऱ्यावर आल्याने पॉरपॉइजचे शव कुजलेल्या अवस्थेत होते. अनेकदा डॉल्फिन मासेही मृत अवस्थेत किनाऱ्यावर सापडतात. पावसाळ्यात समुद्रातील स्थिती बदलत असल्याने मासे मृत होऊन किनाऱ्यावर येत असल्याचा अंदाज आहे. मृत पॉरपॉइजची नियमानुसार विल्हेवाट लावली जाईल, असे कांदळवन कक्षाचे वनपरिक्षेत्र अधिकारी शरण देशपांडे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *